Tiranga Times Maharastra
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर अंधार पडताच छुप्या पद्धतीने मतदारांना फितवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली. यानंतर आयोगाच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईत संशयास्पद हालचाली, संभाव्य पैसे व साहित्य वाटपाचे पुरावे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारांमुळे प्रशासन सतर्क झाले असून संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला उघड झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
